केंद्राकडून अन्याय सुरूच सीएनजी स्टेशनची राज्यात कमतरता; गुजरात पुढे, महाराष्ट्र मागे

महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्यात आले. महाराष्ट्र राज्य हे गुजरातच्या मागे कसे राहील यासाठी केंद्रातील सत्ताधारी आवर्जून प्रयत्न करत आहेत. आता आणखी एक बाब उघडकीस आली आहे. देशातील कोणत्या राज्यात किती सीएनजी स्टेशन आहेत, याची माहिती पेट्रोलियम मंत्री सुरेश गोप यांनी संसद सभागृहात दिली. मार्च 2024 पर्यंत देशात एकूण 6 हजार 861 सीएनजी स्टेशन आहेत. यात सर्वात जास्त उत्तर प्रदेशात, दुसऱया नंबरवर गुजरात आणि तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र राज्य आहे, अशी माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 1081 सीएनजी स्टेशन आहेत. दुसऱया नंबरवर असलेल्या गुजरात राज्यात 1 हजार 17 सीएनजी स्टेशन आहे, तर तिसऱ्या नंबरवरील महाराष्ट्र राज्यात केवळ 964 सीएनजी स्टेशन आहेत. केंद्राला सर्वात जास्त महसूल हा महाराष्ट्रातून जातो, परंतु  केंद्राकडून पैसा मिळत नाही.

चार वर्षांत तीन पट संख्या वाढली

हिंदुस्थानात क्लिन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने वेगवेगळय़ा राज्यांत सीएनजी स्टेशन स्थापन करीत आहे. गेल्या चार वर्षांत तीन पट संख्या वाढली आहे. 2020 मध्ये देशात एकूण 2 हजार 188 सीएनजी स्टेशन होते. 2021 मध्ये 3,094 संख्या झाली. 2022 मध्ये 4433 सीएनजी स्टेशन उभारण्यात आले. 2023 पर्यंत 5665 तर 2024 मध्ये 6861 सीएनजी स्टेशनची संख्या पोहोचली. 2032 पर्यंत देशात 18 हजार 336 सीएनजी स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

जम्मूकश्मीरमध्ये केवळ एक स्टेशन

जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ सीएनजी स्टेशन उभारण्यात आले आहे. पुद्दुचेरीमध्ये 5, त्रिपुरा आणि दमन आणि दीवमध्ये 6 सीएनजी स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. दिल्लीत 491 सीएनजी स्टेशन उभारण्यात आले आहेत.