मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या सभेचे निमंत्रण

शहरात विविध भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांशी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी संवाद साधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या, 14 रोजी सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होत असून या सभेला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकण्याचे आवाहन दानवे यांनी केले.

बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, युवक, गृहिणी, नोकरदार, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण, खेळाडू, व्यावसायिक आणि उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून शहरातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे (पश्चिम), डॉ. बाळासाहेब थोरात (मध्य), व लहू शेवाळे (पूर्व) यांना मतदान करण्याचे आवाहन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने व महाविकास आघाडीने घोषित केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाचे पॉम्प्लेट देऊन महाविकास आघाडीचे शासन आल्यास सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असा ठाम विश्वास दानवे यांनी यावेळी नागरिकांना दिला.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांशी संवाद

पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधत महायुतीच्या शासन काळात न झालेली भरती महाविकास आघाडीचे शासन आल्यावर तातडीने करुन युवकांना न्याय देऊ. माता भगिनींशी राज्यातील महिला प्रश्नांबाबत आपुलकीने चौकशी करत त्यांनी राज्यात घडत असलेल्या महिला अत्याचारांची माहिती दिली.

याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक मोहन मेघावाले, मकरंद कुलकर्णी, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, अनिल जैस्वाल, किशोर नागरे, उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे, अनिल लहाने, संदेश कवडे, नारायण आघाव, स्वप्निल परदेशी, वीरभद्र गादगे व गौरव पुरंदरे उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे संभाजीनगर पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे यांना मतदान करण्याची विनंती करण्यात आली.

विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, अनिल लहाने, विभाग प्रमुख विनोद सोनवणे, विष्णू कापसे, कान्हुलाल चक्रनारायण, प्रल्हाद निमगावकर, मोहन मस्के, सूर्यकांत कुलकर्णी, देविदास पवार, कल्याण चक्रनारायण, रामदास वाघमारे, सुखदेव जिगे, मोहन तिरच्छे, मनोज जोगदंड, भारत डोके, बालाजी जाधव, जगदीश वेताळ, महाडिक, मसालगे, पप्पू बनसोडे, सूरज देशमुख, काकासाहेब आगळे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.