
मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह अद्याप सुरू आहे.बाप्पाच्या जयघोषात अजूनही मुंबईत विसर्जन सुरू आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात हजारहून अधिक गणपती विसर्जित करण्यात आले आहेत.
विसर्जनासाठी मुंबईचे समुद्र किनारे गर्दीने फुले आहेत. पालिकेने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचीही सोय केली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात विसर्जन सुरू आहे.संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 7 हजार 574 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यात 300 सार्वजनिक गणपतींचा समावेश आहेत. तसेच 7 हजार 227 घरगुती आणि 47 गौरींचेही विसर्जन करण्यात आले आहे. कृत्रिम तलावात 2 हजार 880 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे.
दुपारची आरती झाल्यानंतर लालबागचा राजाची मिरवणूक सुरू झाली. यावेळी कार्यकर्ते आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.