महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल घोषित होणार आहेत. पण त्यापूर्वीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. कारण सर्व्हेमधून मतदारांनी मिंधे आणि भाजपविरोधात नाराजी व्यक्त केला आहे.
सी वोटरने राज्यात एक सर्व्हे केला आहे. त्यात मतदारांना महायुतीच्या कारभाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात 51 टक्के मतदारांनी महायुतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे सरकार बदलले पाहिजे असे मतही या 51 टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे. 51.3 मतदारांनी या सरकारबद्दल राग असल्याचे म्हटले आहे. तसेच हे सरकार हटवून नवीन सरकार राज्यात आले पाहिजे अशी इच्छा या मतदारांनी व्यक्त केली आहे.