दिवाळीत 53 टक्क्यांहून अधिक यूपीआय पेमेंट

देशात यंदाच्या दिवाळीत 10 अब्जांहून अधिक व्यवहार यूपीआय पेमेंटद्वारे झाले असून तब्बल 53 टक्क्यांहून अधिक पेमेंट हे यूपीआयच्या माध्यमातून झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे हिंदुस्थानींनी दिवाळीत यूपीआयद्वारे व्यवहार करण्याचा नवा विक्रम रचला आहे. यात कार्ड आणि मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांचाही समावेश आहे.

ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात 16.5 अब्ज व्यवहार झाले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. केवळ एका दिवसात यूपीआयद्वारे मोठय़ा प्रमाणावर व्यवहार झाले असून डेबिट कार्डच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये 35 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये 433 दशलक्ष व्यवहार झाले. हाच आकडा गेल्या वर्षी 320 दशलक्ष इतका होता ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.