पाकिस्तानात सैन्याविरोधात 10 हजारांहून अधिक नागरिक रस्त्यावर

पाकिस्तानच्या सीमेवरील खैबर पख्तूनख्वा येथे सैन्याविरोधात लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. 10 हजारांहून अधिक नगरिकांनी रस्त्यावर उतरून सैन्य आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दहशतवाद्यांवर कारवाईच्या नावाखाली सैन्याने अक्षरशः दहशतवाद माजवला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सैन्याने खैबर पख्तुनख्वा परिसरात अशांती पसरवल्यामुळे दहशतवादी हल्ले वाढल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. खैबर परिसरात सुरु असलेले मिलिट्री ऑपरेशन लवकरात लवकर बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसारत गेल्या 20 वर्षांपासून पाकिस्तानचे सैनिक दहशतवादविरोधी मोहीमेच्या माध्यमातून दहशत माजवत आहेत तसेच नागरिकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचे नेते जमालुद्दीन वजीर यांनी केला.