मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. 9 जूनपर्यंत मुंबईत तर 14 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापेल अशी आनंदवार्ताही हवामान विभागाने दिली आहे. 1 जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून यंदा दोन दिवस आधीच म्हणजेच 30 मे रोजी केरळात दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने केरळमध्ये हजेरी लावली असून आज ईशान्येकडील भागही व्यापला.