![income-tax-department](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/08/Income-Tax-Department-696x447.jpg)
जर बायकोला खर्चासाठी काही रक्कम देत असाल तर महागात पडू शकतं. कारण इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. अनेकांना हा नियम माहीत नसतो. त्यामुळे अडचणीत सापडू शकता. यासंदर्भात आयकर खात्याचे काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पती-पत्नीमध्ये पैशांची देवाणघेवाण खूप सामान्य बाब आहे.
नवरा बायकोला घरखर्चासाठी किंवा गिफ्ट म्हणून काही रक्कम दिली ती आयकर नियमांच्या कक्षेत येत नाही. ही रक्कम नवऱ्याची असते. त्यामुळे पत्नीवर कुठला टॅक्स लागत नाही. मात्र पत्नीने ही रक्कम एफ.डी., शेअर मार्केट, मालमत्ता यामध्ये गुंतवली तर त्या रकमेवर कर द्यावा लागेल. ‘क्लबिंग ऑफ इन्कम’ या नियमांतर्गत हे उत्पन्न नवऱ्याच्या उत्पन्नात जोडले जाते. त्यामुळे इन्कम टॅकसची नोटीस येऊ शकते.