
महाकुंभमेळ्यात आपल्या सौंदर्यामुळे अनेकांना भुरळ पाडणारी मोनालिसा भोसले गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. महाकुंभमध्ये व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. यानंतर तिचे शूटिंग दरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, सध्या मोनालिसाचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती दिग्दर्शक सनोज मिश्राबद्दल बोलताना दिसत आहे. बलात्काराचा आरोप असणाऱ्या सनोज मिश्रांबद्दल यावेळी तिने अनेक गोष्टी सांगितल्या.
View this post on Instagram
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आणि मोनालिसाच्या चाहत्यांनी मोनालिसाला सतर्कतेचा इशारा दिला. सनोज मिश्रांसोबत चित्रपट न करण्याचा सल्ला मोनालिसाला दिला होता. यावर मोनालिसाने प्रतिक्रिया दिली. तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. नमस्कार, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. सोशल मीडियावर अनेक लोकांनी घाणेरड्या गोष्टी पसरवल्या आहेत. सनोजजी मला त्यांच्या मुलीसारखे वागवतात. त्यांनी कधीही घाणेरड्या नजरेने माझ्याकडे पाहिले नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की, तुम्ही खोटी माहिती पसरवू नका, असे ती यावेळी म्हणाली.
मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक; जाणून घ्या कारण…