नंदुरबारमध्ये ‘मोनालिसा’च्या नातेवाईकांची ‘जत्रा’

महाकुंभमेळ्यातून आकर्षक डोळे आणि अप्रतिम सौंदर्यामुळे मोनालिसा ही रुद्राक्ष विक्रेती तरुणी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. तिला चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली आहे. अशातच मोनालिसाची जादू नंदुरबार येथील तोरणमाळ यात्रेतही पाहायला मिळत आहे. या यात्रेत 100 हून अधिक रुद्राक्ष विक्रेते दाखल झाले असून हे विक्रेते आपले मोनालिसाशी नाते असल्याचे सांगून ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

मोनालिसा ही आपली भाची असल्याचे रुद्राक्ष विक्रेत्या जमनाबाई यांनी सांगितले. तर काहींनी मोनालिसा आपल्या आत्याची मुलगी आहे, मी मोनालिसाची मावशी आहे आणि आम्ही मोनालिसाच्या घराजवळच राहतो, असे सांगून ग्राहकांचे लक्ष वेधले.