व्हायरल गर्ल मोनालीसा भोसलेला रुपेरी पडद्यावर झळकणार, बॉलीवुडमधील डायरेक्टरने दिली चित्रपटाची ऑफर

आजच्या युगात जर एखादी व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल झाली तर त्याचे नशीब चमकायला वेळ लागत नाही. तसेच प्रयागराज महाकुंभ 2025 मधील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेच्या घाऱ्या डोळ्यांची जोरदार चर्चा होत असतानाच मोनालिसाचं नशीब चमकलंय. बॉलीवुडच्या एका डायरेक्टरने मोनालिसाला चित्रपट ऑफर केला आहे.

बॉलीवुडचे डायरेक्टर सनोज मिश्राने त्यांच्या येणाऱ्या नवा चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपुर’ मध्ये काम करण्याची ऑफर मोनालीसाला दिली अशी माहिती सनोज मिश्राने त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मी ‘द डायरी ऑफ मणिपूर’ हा चित्रपट बनवणार आहे, मी या चित्रपटात मनोलिसाला कास्ट केले आहे. मी तिच्या शोधात प्रयागराज महाकुंभालाही गेलो होतो. मात्र, ती तिथून तिच्या घरी परत आली आणि आता मी सध्या मध्य प्रदेशातील इंदौर शहराजवळील महेश्वर गावात मोनालिसाच्या घरी आलो आहे. या काळात मी तीच्या कुटुंबीयांशी बोललो आणि त्यांना सांगितले की मी त्यांच्या मुलीला चित्रपटात घेणार आहे. आम्ही अनेक मुद्द्यांवर आपापसात चर्चा केली. खरे सांगायचे तर, मोनालिसाचे वडील खूप साधा माणूस आहे. मला आशा आहे की मोनालिसा माझ्या चित्रपटासाठी कठोर परिश्रम करेल. तसेच द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटात मोनालिसासोबत अभिनेता राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित राव देखील दिसणार आहे.