महाकुंभातील मोनालिसा दिसणार चित्रपटात

महाकुंभ मेळ्यामध्ये प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक सनोज मिश्रा बनवत आहेत. या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार असून ती लष्करी जवानाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात मणिपूरमधील हिंसाचारात प्रेमकथा आणि मुलीचा संघर्ष दाखवण्यात येईल. 20 कोटी रुपयांच्या बजेटच्या या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. चित्रपटाचे चित्रीकरण इंफाळ, मणिपूर, तसेच दिल्ली आणि लंडनमध्ये केले जाईल, असे निर्मात्याने सांगितले.

मोनालिसाच्या भागाचे चित्रीकरण मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये सुरू होईल. सनोज मिश्रा यांनी याआधीकाशी टू काश्मीर’, ‘ डायरी ऑफ वेस्ट बंगाल’, ‘रॉक बँड पार्टी’, ‘राम जन्मभूमीआणिगांधीगिरीयासारखे चित्रपट बनवले आहेत. सनोज मिश्रा हे या चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत, जो सनोज मिश्रा फिल्म्सच्या बॅनरखाली बनणार आहे.