आवडीने मोमोज खाताय? मग जाणून घ्या मोमोज खाण्याचे धोकादायक तोटे

आजच्या काळातील यंगस्टर्समध्ये फास्ट फुड खाण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढले आहे. यातच या पिढीला इंस्टट फुड जास्त पसंतीचे वाटते. त्यामुळे हे फुड सहजरित्या रस्त्यालगत लगेच उपलब्ध होतात. पण, या पदार्थांमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यातच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे म्हणजे मोमोज. मैद्यापासून बनवलेले हे मोमोज जितके चवीला स्वादिष्ट असतात तितकेच शरीराचं नुकसानही करतात. म्हणूनच मोमोज जास्त प्रमाणात खाणं टाळलं पाहिजे. मोमोज माणसाला आतून पोकळ बनवण्याचं काम करतात. जास्त मोमोज खाल्ल्याने किडनीच्या समस्या होऊ शकतात आणि वजन देखील वाढण्याचा धोका असतो.

  • मोमोजचे पीठ ज्या रसायनाने पॉलिश केलं जातं, त्याला बेंझॉयल पेरोक्साइड म्हणतात. हे केमिकल चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरतात. त्यामुळे हे केमिकल पोटात गेल्याने किडिनीला धोका पोहोचवू शकतो
  • मोमोज बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. मैदा आम्लयुक्त पदार्थ असून त्याचे सेवन केल्याने मैदा हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतं. ज्यामुळे हाडं पोकळ बनतात.
  • पिठापासून बनवलेले मोमोज विकणारे काही लोक चव वाढवण्यासाठी त्यात केमिकलचा वापर करतात. या केमिकलला मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणतात. याचा वापर चव वाढवण्यासाठी आणि सुगंधित करण्यासाठी केला जातो. या केमिकलमुळे लठ्ठपणा वाढतो.
  • मोमोजमुळे संसर्ग होऊ शकतो आणि मुलांमध्ये नवीन रक्त निर्मितीची प्रक्रिया मंदावते. याशिवाय काही ठिकाणी मांसाहारी मोमोजही बनवले जातात. बहुतेक मोमोजमध्ये मृत प्राण्यांचे मांस मिसळलं जातं. या परिस्थितीत इन्फेक्शन होण्याचा धोका वाढू शकतो.