
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि कझान येथे केलेल्या परदेश दौऱयावर तब्बल 20 कोटींचा खर्च करण्यात आला. त्यापैकी मोदी… मोदी जयजयकारासाठी म्हणून कम्युनिटी रिसेप्शनवर 1.87 कोटींचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे.
दोन देशांच्या परदेशवारीच्या खर्चाचा आकडा रशिया, अबुधाबी येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने आरटीआयला दिलेल्या उत्तरात उघड केला आहे. माजी नौदल अधिकारी कमोडोर लोकेश बत्रा यांनी जनतेकडून भरमसाठ करापोटी घेण्यात येत असलेला पैसा नेमका कुठे खर्च केला जातोय हे जाणून घेण्यासाठी ही माहिती मागितली होती.
मोदींनी जुलैमध्ये मॉस्कोचा दौरा केला तर ऑक्टोबरमध्ये कझानचा दौरा केला. या दोन्ही दौऱयांवर हिंदुस्थानचे 15 कोटींहून अधिक खर्च झाले तर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी अबुधाबीचा दौरा केला. या दौऱयावर 4.95 कोटी रुपये खर्च झाले होते.
अशी झाली कोट्यवधींची उधळण
जुलैमध्ये मॉस्को दौऱयावरील एकूण खर्च – 5.12 कोटी
- हॉटेल व्यवस्थापन – 1.81 कोटी
- कम्युनिटी रिसेप्शन – 1.87 कोटी
- वाहतूक – 59.06 लाख
- रोजचे भत्ते – 20.81 लाख
- इतर खर्च – 62.56 लाख
ऑक्टोबरमध्ये झालेल्या कझान दौऱ्यावरील एकूण खर्च – 10.24 कोटी
- हॉटेल – 1.62 कोटी
- वाहतूक – 1.79 कोटी
- रोजचा भत्ता – 25.67 लाख
- इतर खर्च – 6.56 कोटी