मोदींचं सरकार अल्पमतातील सरकार! संजय राऊत यांची राज्यसभेतील भाषणातून तुफान फटकेबाजी

sanjay-raut-rajya-sabha

केंद्रात NDA सरकार आल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे. पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन खऱ्या अर्थानं वादळी भाषण ठरलं आहे. विरोधकांची ताकद या अधिवेशनात स्पष्ट दिसून येत असून विरोधक सरकारवर अक्षरश: बरसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केंद्रावर जोरदार टीका केली.

राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत. संविधान पालनाची सुरुवात तिथूनच होते. आम्ही त्यांचा आदर करतो, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकार स्थापनेच्यावेळी वृत्तपत्रात छापून आलेल्या फोटोचा उल्लेख केला. राहुल गांधी हे देखील संसदेचे विरोधीपक्ष नेते आहेत, याची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.

मोदीजींची सरकार बहुमत नाही तर अल्पमतातील सरकार आहे. काँग्रेसमुक्त भारतची भाषा करणारऱ्या मोदींना जनतेने बहुमतमुक्त केले आहे. 240 मधली 50 जागा भाजपनं चोरल्या आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, बिहारमध्ये भाजपला खूपच कमी मतं मिळाली आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांना खोडून काढलं.

अजून सुरू नाही केलं आणि धन्यवाद काय?

संजय राऊत बोलत असताना पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला तसेच शेवटी त्यांनी वेळ संपत असल्याचं सांगत ‘धन्यवाद’असं म्हटलं. त्यावर संजय राऊत म्हणाले की अजून सुरू नाही केलं आणि धन्यवाद काय? यामुळेच आम्ही म्हणतो की संविधान संकटात आहे, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केली.