पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. मणिपूरमधील अलीकडील हिंसक संघर्ष अस्वस्थ करणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हिंसाचार संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.