
देशातील उत्पादन क्षेत्रात घट झाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. खरा ‘आत्मनिर्भर भारत’ हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये होता, याची जाणीव आता कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली असावी, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.
देशातील उत्पादन क्षेत्राचे हब बवण्यासाठी भाजपने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाहीत, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून केली आहे. मोदी सरकारचे मेक इन इंडिया हे कृतीत न दिसता भंपक प्रसिद्धीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हिंदुस्थानला ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवण्यासाठी 2014 मध्ये भाजपने 10 आश्वासने दिली होती. त्यापैकी एकही पूर्ण झालेले नाही, अशी टीका खर्गे यांनी केली.
‘या देशाला आता देवच वाचवेल’, बलात्काराबद्दल अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर कपिल सिब्बल संतापले
PSU ची विक्री, MSME चे नुकसान
उत्पादन क्षेत्रातील रोजगारात झालेली घट आणि जीडीपीमधील कमी झालेला वाटा यामुळे स्थिती बिकट झाली आहे. सरकारी कंपन्यांची (PSU) विक्री होत आहेत. एमएसएमईचे नुकसान होत आहे. नोकरशहांचा लालफीचीचा कारभार अडचणीचा ठरत आहे. हिंदुस्थानचे उद्योजक हिंदुस्थानला प्राधान्य देण्याऐवजी विदेशात जात आहेत. तिथे कंपन्या उभ्या करत आहेत. निर्यातीत मोठी घट झाली आहे, असे मुद्दे मांडत खर्गे यांनी मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर सडकून टीका केली.