
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना चांदीच्या ट्रेनचे मॉडेल भेट म्हणून दिले. या ट्रेनवर एका बाजूला दिल्ली टू डेलावेयर असे लिहिले आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडियन रेलवेज लिहिले आहे. ट्रेनचे हे मॉडेल 92.5 टक्के चांदीने बनवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कारागीरांनी ट्रेनचे हे मॉडेल तयार केले आहे. याशिवाय मोदींनी बायडेन यांची पत्नी आणि अमेरिकेची पहिली नागरिक जिल बायडेन यांना कश्मिरी पश्मीना शाल भेट दिली. याआधी मोदी यांनी शनिवारी रात्री उशिरा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांची होमटाऊन डेलावेयर येथे भेट घेतली.
मोदी अमेरिकेत पोहोचताच बायडेन यांनी त्यांची गळाभेट घेतली. तसेच बायडेन यांनी त्यांना आपले घरही दाखवले. या भेटीनंतर हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे बायडेन यांनी सोशल मीडियावर लिहिले. बायडेन यांनी यावेळी मोदी यांच्या युक्रेन आणि पोलंड दौऱ्याचीही स्तुती केली.