
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई रेल्वे पोलीस दल सतर्क झाले असून रेल्वे पोलीस आणि गृहरक्षक दल व एमएसएफच्या जवानांकडून रेल्वे स्थानकांवर मॉक ड्रील केले जात आहे. मुंबईत 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप प्रवासी आणि पोलिसांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावेळी रेल्वे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या गाड्या सुटतात. त्यामुळे त्या स्थानकातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.