मोबाईल नंबर पोर्टसाठी सात दिवस थांबावे लागणार; 1 जुलैपासून नवा नियम

सिमकार्ड बदलल्यानंतर मोबाईल नंबर पोर्ट केल्यास आता सात दिवस थांबावे लागणार आहे. यासंबंधीचा नवा नियम येत्या 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाईल फोन नंबरवरून आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी हा नवीन नियम आणला आहे. याआधी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी दहा दिवस वाट पाहावी लागत होती. परंतु आता नव्या नियमामुळे केवळ सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. ट्रायकडून 14 मार्च 2024 ला जारी करण्यात आलेल्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (नववे संशोधन) नियम 1 जुलै 2024 पासून लागू होईल.

व्होडाफोनचेही रिचार्ज महाग

टेलिकॉम कंपनी जिओच्या दरवाढीनंतर एअरटेल आणि आता व्होडाफोन-आयडिया या दोन्ही कंपन्यांनी शुक्रवारी प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल दरांमध्ये प्रत्येकी 10 ते 21 टक्क्यांनी वाढ केली. सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर दूरसंचार कंपन्यांनी मोठी दरवाढ केल्यामुळे या निर्णयाला महत्त्व आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या विविध प्लॅनमध्ये 10 ते 21 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे. एअरटेलची नवीन दरवाढ पुढील महिन्यात 3 जुलैपासून लागू होईल तर व्होडापह्न-आयडियाने 4 जुलैपासून दरवाढीची घोषणा केली आहे.