
जुन्या वैमनस्यातून अमन अंधेवार नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. अमन अंधेवार मनसेच्या कामगार विभागाचा जिल्हाप्रमुख असल्याचे कळते आहे. या हल्ल्यात अमन जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पाठीमागून आला आणि गोळीबार केला; चंद्रपुरात पूर्व वैमनस्यातून हल्ला pic.twitter.com/gJrlbdPbic
— Saamana (@SaamanaOnline) July 4, 2024
चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुल आहे. याच संकुलात अमनचे कार्यालय आहे. येथेच अमनवर हल्ला झाला. हा परिसर कायम गजबजलेला असतो. गेल्या वर्षी याच ठिकाणी अमनच्या लहान भावावरही हल्ला करण्यात आला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून, आरोपींचाही शोध घेत आहेत.