लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका – राज ठाकरे

सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात जात असेल तर ते चुकीचे आहे. लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका. तर राज्यात नवीन उद्योग आणा, असे सांगत मनसे नेते राज ठाकरे यांनी लाडक्या बहीण योजनेला विरोध केला. समाजातील कोणताही घटक फुकट काहीच मागत नाही. महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना रोजगार देऊन सक्षम केले पाहिजे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत राज्याच्या तिजोरीत ठणठणाट होऊ शकतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देता येणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.