मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या गुंडांना शिवसैनिकांनी जनतेला पैसे वाटण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या बांगर यांच्या गुंडांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी गेलेल्या एका क्रुझर गाडीच्या काचा फोडल्या. त्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी गाडी गेली होती. त्या गाडीवर संतोष बांगर यांच्या गुंडांनी दगडफेक केली. या दगडफेकीत क्रूझर गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कळमुरी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिवसेना उमेदवार माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, शिवसेनेचे माजी खासदार ॲड. शिवाजी माने, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, जिल्हा संघटक बालासाहेब मगर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.