
भाजप नेत्या आणि प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा होईल. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले आमदार परवेश वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. रेखा या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरतील.