
शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनंत (बाळा) नर यांच्या नवीन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना शाखा क्रमांक 77 मेघवाडी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जोगेश्वरी पूर्व येथे हे नवीन संपर्क कार्यालय आहे. जोगेश्वरी विधानसभेतील सर्व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.