
मार्चमध्ये मिसिसिपीमध्ये आलेल्या भयंकर चक्रीवादळात एक पाळीव कासव गायब झाले होते. मर्टल असे या कासवाचे नाव. आता काही आठवडय़ानंतर कासव त्याच्या कुटुंबाकडे परतलंय. 15 मार्च रोजी वादळामुळे इमॅन्युएल कुटुंबाने कोकोमो भागातील त्यांचे घर सोडले. ते परत आले तेव्हा त्यांना कासवाच्या अंगणातील घरावर पाइनची दोन झाडे पडल्याचे दिसले. आठवडय़ानंतर एका शेजाऱयाला जखमी कासव सापडला. 4 एप्रिल रोजी त्याला वैद्यकीय उपचारांसाठी सेंट्रल मिसिसिपी टर्टल रेस्क्यूमध्ये नेण्यात आले. रेस्क्यू सेंटरच्या सहसंचालक क्रिस्टी मिलबर्न यांनी इमॅन्युएल कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्याच्या ताब्यात कासवाला दिले. ‘‘त्याने खूप काही सहन केले आहे,’’ असे मर्टलची मालकीण टिफनी इमॅन्युएल म्हणाली.