अॅमेझॉन प्राईमवरील बहुचर्चित वेब सिरीज ‘मिर्झापूर’च्या सिजन 3 ची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. मिर्झापूरच्या सिजन 3 ला गुरुवारी मध्यरात्रीपासून स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली. मिर्झापूरच्या दोन्ही सिजनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता या नव्या सिजनची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. मात्र हा सिजन रिलीज होतानाच मिर्झापूरच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. या सिझनचा पहिला एपिसोड रिलीज झाल्यानंतर काही वेळातच ही वेब सिरीज ऑनलाईन लीक झाली आहे.
मिर्झापूर या वेब सिरीजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या वेबसिरीजमधील कालीन भय्या, बबलू, गुड्डू, मुन्ना, गजगामिनी यांच्या भूमिकाही गाजल्या. त्यामुळे अनेक चित्रपट प्रेमींनी खास या वेब सिरीजसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओचे सब्स्क्रिप्शन घेतले होतो. मात्र एकीकडे या सिरीजचा एक एपिसोड रिलीज होताच दुसरीकडे ही संपूर्ण वेब सीरिज एचडी क्वालिटीमध्ये लीक झाली आहे. त्यामुळे या सिरीजच्या निर्मात्यांना, कलाकारांना आणि संपूर्ण टीमला याचा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
यंदाच्या सिझनमध्ये दहा एपिसोड असणार आहेत. या वेब सिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ‘पंचायत 3’ चे सचिवजी म्हणजेच जितेंद्र कुमार ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.