
‘मिर्झापूरचा 3’ मध्ये मुन्ना भैयाला अनेकांनी मिस केले, मात्र मुन्ना भैय्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘मिर्झापूर 3’ च्या बोनस एपिसोडमध्ये मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदु शर्मा परतणार आहे. नुकतीच मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोडची रिलीज जेट जाहीर करण्यात आली आहे.
प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर या बोनस भागासंदर्भात एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुन्ना भैया स्वतः दिसत आहे. ”हम क्या गए, पूरा बवाल मच गया। सुना है, हमारे लॉयल फैन्स बहुत मिस किए हमको? , असे म्हणताना दिसत आहे. पुढे तो म्हणतो, ”सीजन 3 में कुछ चीजें मिस किए आप…जस्ट फॉर यू, मुन्ना त्रिपाठी के सौजन्य से। क्योंकि हम करते पहले हैं, सोचते बाद में हैं।” असे म्हणताना दिसत आहे.
‘मिर्झापूर सीझन 3’ आला आहे आणि आता निर्माते त्याचा बोनस एपिसोड घेऊन येत आहेत. त्यात ‘मिर्झापूर’मधील प्रसिद्ध पात्र मुन्ना भैयाची कथा दाखवण्यात येणार असल्याचे प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे. यासोबतच त्याच्या टीझरमध्ये रिलीज डेटची माहितीही देण्यात आली आहे. ‘मिर्झापूर सीझन 3’ चे बोनस भाग प्राइम व्हिडिओवर 30 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होतील.
View this post on Instagram
मिर्झापूर वेब-सीरिजमध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारणाऱ्या अली फजलने ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनसाठी बोनस एपिसोड रिलीज करण्याची योजना उघड केली होती. तेव्हापासून चाहत्यांना आशा होती की या बोनस एपिसोडमध्ये मुन्ना भैया पुन्हा येईल. अखेर चाहत्यांची शंका खरी ठरली आणि मुन्ना भैय्या टीझरमध्ये त्याच्याच स्टाईलमध्ये दिसत आहे.