
उन्हाळा आणि पुदिना यांचे एक अनोखे नाते आहे. उन्हाळ्यात पुदिन्याचा वापर हा प्रामुख्याने शरीराला थंडावा प्राप्त करण्यासाठी केला जातो. पुदिन्यामुळे आपली पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. तसेच पुदिन्यामुळे जळजळ, मळमळही कमी व्हायला सुरुवात होते. पुदिना हा केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. पुदिन्याच्या पानांमुळे त्वचा माॅइश्चराइज होते. पुदिन्याच्या वापरातून फेसपॅकही उन्हाळ्यात तयार केला जातो. आता आपण जाणून घेऊन पुदिना टोनरचे फायदे आणि तो कसा बनवायला हवा.
पुदिन्याचा टोनर कसा बनवायचा
चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्याला जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण यानंतरही आपण जास्त पाणी पिऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपण अनेकदा चेहऱ्यावर टोनरचा वापर करतो. टोनरमुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. म्हणूनच आपण बाजारातून वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर चेहऱ्यावर लावतो. यामुळे आपली त्वचा निरोगी राहते, परंतु त्याकरता खिसा मात्र रिकामा होतो. अशा परिस्थितीत घरी ठेवलेल्या पुदिन्याचा वापर करून फेशियल टोनर बनवल्यास त्वचेला त्याचे खूपच फायदे मिळतील. ऐन उन्हाळ्यात चेहऱ्यावरील जळजळ बंद होऊन चेहऱ्याची त्वचा थंड राहण्यास मदत मिळेल.
पुदिन्याचा टोनर लावण्याचे फायदे
पुदिन्यामध्ये मेन्थॉल असते, यामुळे त्वचेला थंडावा निर्माण होतो. तुमचा चेहरा कोणत्याही प्रकारच्या पुरळांमुळे जळत असेल, तर पुदिना टोनर तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता जेणेकरून तो जळजळ थांबण्यास मदत होईल. यामुळे तुमची त्वचाही निरोगी राहील.
पुदिन्याचे टोनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
ताजी पुदिन्याची पाने
पाणी – 2 कप
गुलाबजल -1/3पुदिन्याचा टोनर कसा बनवायचा
पुदिन्याची पाने पाण्याने स्वच्छ धुवावी. त्यानंतर ती बारीक करुन, त्यातून रस काढावा. त्यात नंतर गुलाबजल आणि पाणी मिसळावे. हे पाणी स्प्रे बाॅटलमध्ये भरावे. नंतर त्यात गुलाबजल आणि पाणी मिसळावे. हा स्प्रे बाटलीत ओतावा, त्यानंतर व्यवस्थित मिक्स करुन हे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करावे. हे टोनर लावल्यानंतर, 15 मिनिटे चेहऱ्यावर काहीही लावू नका. हे टोनर लावल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहील.
तुमची त्वचा संवेदनशील असेल तर टोनर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)