मणिपूरमध्ये चिमुरडीची अत्याचार करून हत्या

मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी येथील जंगलात तिचा मृतदेह सापडला. मुलगी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता परत आलीच नाही, असे अधिकाऱयांनी सांगितले. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला आणि अंगावर जखमांच्या खुणा होत्या. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे.