आजारी आईला रुग्णालयात भेटून घरी परतत असताना नागपाडा ते आग्रीपाडा जोडणाऱ्या वाय-ब्रिजवर बाईकस्वाराचे नियंत्रण सुटल्याने नागपाडा ते आग्रीपाडा जोडणाऱ्या वाय-ब्रिजवर अपघात झाला. या अपघातात बाईकस्वाराच्या मागे बसलेल्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मयत आणि बाईकस्वार दोघेही चुलत भाऊ आहेत. याप्रकरणी बाईकस्वारावर नागपाडा पोलिसात निष्काळडीपणाचा गुन्हा दाखल करण्याच आला आहे.
हुदा अन्सारी असे असे मुलाचे नाव आहे. हुदाच्या आईची तब्येत ठीक नसल्याने तिला आग्रीपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला भेटण्यासाठी हुदा चुलत भाऊ अब्दुल वदुद अन्सारीसोबत रुग्णालयात गेला होता. आईला भेटून भावासह बाईकवरून घरी परतत असताना नागपाडा ते आग्रीपाडा जोडणाऱ्या वाय-ब्रिजवर ओव्हरस्पीडिंगमुळे अब्दुलचे नियंत्रण सुटले आणि त्यांची बाईक दुसऱ्या बाईकवर धडकली.
अपघातात अब्दुलच्या मागे बाईकवर बसलेला हुदा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अब्दुल वदुद अन्सारी विरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलम 106(1) आणि 281 नुसार गुन्हा दाखल केला आहे.