
बीडच्या दौऱ्यावर गेलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार? स्वतःचा मोबाईल सांभाळता येत नाही हे असले कसले गृहराज्यमंत्री? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
बीड जिह्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून आधीच गृह खात्यावर टीकेची झोड उठत असताना आता गृह राज्यमंत्र्यांचा मोबाईल लंपास झाल्यामुळे बीड पोलिसांवर नामुष्की ओढावली आहे. माध्यमांचे सर्व कॅमेरे त्यांच्या दिशेने रोखले गेले होते. पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्तही होता. याप्रकरणी गृह राज्यमंत्र्यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.