गिरणी कामगारांचे (Mill Workers) पुनर्वसन मुंबईतच करा, वंचित गिरणी कामगार आणि वारसांना एक संधी द्या, अपात्र गिरणी कामगार आणि वारसांना कागदपत्र उपलब्ध करून द्या, 15 मार्च 2024 चा शासन निर्णय त्वरित रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी तसेच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियानच्या नेतृत्वाखाली 20 संघटनांनी एकत्र येऊन आज आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले. गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच व्हावे यासाठी येत्या 6 मार्च रोजी गिरणी कामगार एकजूटच्या माध्यमातून भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. विशेषतः मुंबईतील गिरणी कामगारांचे पुनर्वसन हा मराठी अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा विश्वास सर्व संघटनांनी दर्शवला, अशी माहिती चळवळीचे अध्यक्ष विवेकानंद बेलुसे यांनी दिली.