
गिरणी कामगार व वारसांना मुंबईतच आपल्या हक्काची घरे मिळवण्यासाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेने 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान ते विधान भवन अशी महामोर्चाची हाक दिली आहे.
या गिरणी कामगार महामोर्चामध्ये सात गिरणी कामगार संघटना सहभागी होणार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गिरणी कामगारांना हक्काच्या घरांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. ज्या गिरणी कामगारांनी या मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नावारूपाला आणले त्याच गिरणी कामगारांना या मुंबईच्या बाहेर हाकलण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. लाखाहून अधिक गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. दुसरीकडे सरकार उद्योगपतींना विशेष सवलत देऊन मुंबईतील मोक्याच्या जागांचे खैरातीसारखी वाटप करत आहे. याचाच निषेध करण्यासाठी येत्या 6 मार्चला महामोर्चाचे आयोजन केले आहे.cx