लाडक्या बहिणींना खास गिफ्ट, दूध दोन रुपयांनी महागले

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना खास गिफ्ट दिले आहे. रोजच्या आहारात समावेश असलेले दूध 2 रुपयांनी महागले आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला.  वाढीव दर उद्यापासून लागू करण्यात येणार आहेत. गायीच्या दुधाचा दर सध्या प्रति लिटर 56 रुपये आहे, तो 58 रुपये होणार आहे. त्याचप्रमाणे म्हशीच्या दुधाचा दर 72 रुपये लिटर आहे, तो दरवाढीनंतर 74 रुपये होणार आहे.