तिने जबरदस्ती माझ्या… गायक मिका सिंगचे बिपाशा बासूवर गंभीर आरोप

अभिनेत्री बिपाशा बासू ही गेल्या पाच वर्षंपासून लाईमलाईटपासून दूर आहे. बिपाशाचा गेल्या काही वर्षात एकही सिनेमा आलेला नाही. दरम्यान आता बिपाशा चर्चेत आली आहे ती गायक मिका सिंग याने केलेल्या आरोपांमुळे. बिपाशा बासू जबरदस्ती माझ्या चित्रपटाचा भाग झाली व नंतर तिने मला खूप त्रास दिला. तिच्या मुळे माझ्या चित्रपटाचे बजेट4 कोटीवरून 14 कोटी झाले”, असे मिका सिंगने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मिका सिंग ”बिपाशा बासूचा नवरा अभिनेता करन सिंग ग्रोव्हर याला घेऊन एक चित्रपट तयार करणार होता.त्या चित्रपटासाठी मिका सिंग 4 कोटींची गुंतवणूक करणार होता.मला त्या चित्रपटात वेगळ्या एका अभिनेत्रीला घ्यायचे होते. मात्र बिपाशा बासू त्या चित्रपटात काम करण्यासाठी मला जबरदस्ती करत होती. ती जबरदस्ती आमच्या प्रोजेक्टचा हिस्सा झाली’, असे मिकाने सांगितले.

त्या चित्रपटाचे शूटींग लंडनला होत होते. मात्र बिपाशाने त्या चित्रपटाच्या सेटवर इतका ड्रामा केला की मला त्या चित्रपटाचा निर्माता असल्याचा पश्चाताप व्हायला लागला. माझ्या चित्रपटाचे बजेट 4 वरून 14 कोटी झाले. बिपाशा तिच्या नवऱ्यासोबत रोमॅण्टिक सीन देखील द्यायला तयार नव्हती,किसिंग सिन द्यायला तयार नव्हती. आम्ही सर्व तिला वैतागलेलो’, असे मिका म्हणालात