जोरदार झटका! मायक्रोसॉफ्टचे स्काईप मेपासून बंद होणार

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले प्रसिद्ध स्काईप अॅप मे 2025 पासून बंद करत असल्याचे शनिवारी जाहीर केले. स्काईप हे दशकभरापासून सुरू होते. स्काईप हे युजर्सला एक दुसऱ्याला कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंगद्वारे जोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापरले जात होते, परंतु कंपनीच्या घोषणेनंतर आता युजर्सला 5 मेपर्यंत डेटा दुसरीकडे सेव्ह करण्याची मुभा आहे.

स्काईपचा वापर खूप आधीपासून वर्किंग, शाळा आणि खासगी कामांसाठी केला जात होता. ही सर्व्हिस सध्या मोफत मिळतेय. ज्या युजर्सला स्काईप वापरायचे आहे त्यांनी मायक्रोसॉफ्ट टीम्सवर जावे, असे कंपनीने म्हटले आहे. स्काईप आणि टीम्स युजर्स सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर कनेक्ट करू शकतात. ज्यांना टीम्सवर जायचे नाही त्या युजर्सनी शटडाऊन करण्याआधी चॅट हिस्ट्री, संपर्क, कॉल लॉगसह स्काईपचा डेटा अन्य ठिकाणी सेव्ह करून ठेवावा, असे कंपनीने म्हटले आहे.