मायक्रोसॉफ्ट हाहाकार! अवघे भूमंडळ डळमळले!! हिंदुस्थानसह अमेरिका, ब्रिटनमध्ये अनेक सेवांना फटका

एटीएमपासून शेअर बाजार आणि टीव्ही चॅनेलपासून जगभरातील विमान पंपन्या प्रामुख्याने वापरत असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रणालीच शुक्रवारी सकाळपासून व्रॅश झाल्यामुळे अवघे भूमंडळ डळमळले. मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील या बिघाडामुळे जगभर हाहाकार उडून एटीएम, बँकिंग, कॉर्पोरेट पंपन्या, विमान सेवा, टीव्ही चॅनेल, शेअर बाजार अशा अनेक सेवासुविधा ठप्पच झाल्या होत्या. हिंदुस्थान, अमेरिका, ब्रिटन आदी अनेक देशांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबई आणि लंडनमधील शेअर बाजारातील व्यवहारही कोलमडले. मायक्रोसॉफ्टवर अवलंबून असणाऱ्या इंडिगोवर 192 उड्डाणे रद्द करण्याची वेळ ओढवली.

 असंख्य उद्योगांना सायबर हल्ले, व्हायरस अटॅकपासून संरक्षण सुविधा पुरवणारी सायबर सुरक्षा फर्म क्राऊडस्ट्राईकने जारी केलेला एक अपडेट जगभरच्या लाखो यूजरनी डाऊनलोड केल्यावर हा गोंधळ सुरू झाला आणि तो वेगाने वाढतच गेला. लाखो संगणकांच्या पडद्यावर संगणक बिघडल्याचा संदेश दाखवणारी निळी स्क्रीन झळकली आणि ठिकठिकाणचे संगणकाधारीत व्यवहार काही अवधीतच बंद पडले. यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मायक्रोसॉफ्ट आणि क्राऊडस्ट्राईक यांनी लगेचच सोशल मीडियावरून जाहीर केले होते. हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बिघाड पूर्णपणे दुरुस्त झाला नव्हता. जगभरातील या गोंधळाचे मूळ कारणाचे निराकरण केल्याचे मायक्रोसॉफ्टने संध्याकाळी जाहीर केले. मात्र, ऑफिस 365 अॅप्स आणि काही सेवांवर त्याचा परिणाम नंतरही काही काळ जाणवत होता.

भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 च्या सुमारास मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर ठप्प झाले. आणि संपूर्णपणे संगणकीय तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला आधुनिक नागरी समाज एका तांत्रिक बिघाडामुळे काही क्षणात कसा हतबल होऊ शकतो याचे प्रत्यंतर दिसून आले. अर्थात कामच बंद झाल्यामुळे वीकेण्ड काही तास आधीच सुरू झाल्याचा आनंदही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसला.

शेअर मार्पेटमधील व्यवहारांनाही या बिघाडाची झळ पोहोचली. अनेकांना शेअर्सची खरेदी-विक्री करता आली नाही. अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसवर ट्रेडिंग करताना तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. ब्रोकरेज फर्म 5 पैसा, आयआयएफएल सिक्योरिटीजच्या यंत्रणा विस्कळीत झाल्या होत्या. लंडन स्टॉक एक्स्जेंचवरही या सेवेचा परिणाम झाला. या गोंधळामुळे मायक्रोसॉफ्ट आणि क्राऊडस्ट्राईकचे शेअरही आज कोसळले.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनमध्ये गोंधळ

या तांत्रिक समस्येमुळे स्काय न्यूज चॅनलने ब्रिटनमध्ये सकाळपासूनच थेट प्रसारण बंद केले होते. ऑस्ट्रेलियन टेलिकॉम पंपनी टेलस्ट्रा ग्रुपच्या कामकाजातही दिवसभर अडथळे येत होते. तेथील एबीसी न्यूज 24 वाहिनीला आणि वूलवर्थ सुपरमार्पेटमधील संगणकीय व्यवस्थाही यामुळे बिघडली होती. पोलिसांची संपर्क यंत्रणाही कोलमडली होती. अमेरिकेतील अनेक राज्यांतील 911 आपत्कालीन सेवांनाही या गोंधळाचा फटका बसला.

ब्लू स्क्रीन एरर काय आहे

जेव्हा एखादा गंभीर बिघाड विंडोज प्रणालीला संगणक वा लॅपटॉप अनपेक्षितपणे बंद किंवा रीस्टार्ट करण्यास भाग पाडतो तेव्हा आधी स्क्रीनवर निळय़ा पडद्यावर एरर मेसेज दिसतो. त्याला ब्लू स्क्रीन एरर, ब्लॅक स्क्रीन एरर किंवा स्टॉप कोड एरर असेही म्हणतात. तुमच्या कॉम्प्युटरचे नुकसान टाळण्यासाठी विंडोज बंद करण्यात आली आहे किंवा तत्सम सूचना या मेसेजमध्ये दिसते. हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरमधील बिघाडांमुळे असा खेळखंडोबा होऊ शकतो.

विमानसेवा, विमानतळांना मोठा फटका

संगणक बंद झाल्यामुळे जगभरच्या विमान पंपन्यांवर उड्डाणांच्या तयारीत असलेली विमाने थांबवून ठेवण्याची वेळ आली होती. अमेरिकन, युनायटेड आणि डेल्टा या अमेरिकेतील किमान तीन प्रमुख विमान पंपन्यांनी तत्काळ सर्व उड्डाणे रोखली. ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती होती. मेलबर्न, सिडनी, अॅमस्टरडॅम, बर्लिन ब्रँडनबर्ग, झुरीक विमानतळांवर या बिघाडामुळे विमान वाहतूक स्थगित करण्यात आली होती.देशातील जवळपास सर्वच विमान पंपन्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमवरच काम करतात. अकासा, इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, स्पाईस जेट आदी पंपन्यांना या सर्व्हर डाऊनचा मोठा फटका बसला.

 ब्ल्यू अॅटॅक

विंडोज प्रणाली वापरणाऱ्या अनेकांच्या लॅपटॉप आणि संगणकांच्या स्क्रीनवर दुपारी 12.30च्या सुमारास ब्ल्यू अॅटॅक झाला आणि जगभर एकच गोंधळ  उडाला. तुमची सिस्टिम धोक्यात आहे. रीस्टार्ट करा, असा मेसेज स्क्रीनवर झळकला. रात्री उशिरापर्यंत बिघाड पूर्णपणे दुरुस्त झाला नव्हता.

बँकांमध्येही बोंब

या बिघाडामुळे बँकिंग व्यवहारही विस्कळीत झाले होते. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनीही अडचणी येत असल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. एटीएम सेवेलाही मोठा फटका बसला.

जीमेल ब्लॉक

इन्स्टाग्राम, अमेझॉन, जीमेल ही अॅप्स वापरतानाही अडथळे येत असल्याची तक्रार अनेकांनी केल्याचे आउटेज ट्रकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरने नोंदवले आहे. टीव्ही चॅनेल्स, ऑनलाईन स्टोअर्स, हॉस्पिटल्स तसेच आयटी क्षेत्रालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. ब्रिटनमध्ये स्काय न्यूजचे प्रक्षेपण थांबवावे लागले.

मायक्रोसॉफ्टची अॅप्स बंद

मायक्रोसॉफ्टचे विविध अॅप्स आणि सेवा बंद पडल्या. मायक्रोसॉफ्ट 360, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट अझ्युर, मायक्रोसॉफ्ट स्टोर, वन ड्राइव्ह, वननोट, आऊटलुक एक्स्प्रेस, पॉवरबीआय, मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक, एक्सबॉक्स, मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आधारीत सेवांवर परिणाम झाला.