मायक्रोसॉफ्ट बिघाडातून चीन बचावला

जगभरातील विमान सेवा, आयटी प्रणाली आणि बँका, शेअर मार्केट अशा अनेक व्यवसायांना बंदची पाटी लावण्याची वेळ आणणाऱया मायक्रोसॉफ्ट प्रणाली बिघाडाचा चीनवर फारसा परिणाम झाला नाही. क्राऊडस्ट्राईक आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यावर फारसे अवलंबून नसल्यामुळेच जगाच्या तुलनेने चीन सहिसलामत सुटला आहे.

चीनमध्ये सरकारी खाती, उद्योगधंदे, चिनी पंपन्या मायक्रोसॉफ्ट वा क्राऊडस्ट्राईक फारसे वापरतच नाही. त्याऐवजी चीन स्थानिक प्रणालींचा उपयोग करतो. अलिबाबा, टेन्सेंट, हुवेई यांसारख्या स्थानिक पंपन्याही क्लाऊड सुविधा देतात. चिनी पंपन्या त्याचाच उपयोग प्रामुख्याने करतात. यामुळे चीनचा आपोआप बचाव झाला.

राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य

चीनमध्ये कार्यरत असलेल्या विदेशी पंपन्या, संस्थांना मात्र या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. मायक्रोसॉफ्टवर अवलंबून असलेले त्यांचे संगणक, लॅपटॉप बंद पडले. सरकारी खाती, विभाग आणि चिनी उद्योगसमूह विदेशी आयटीपेक्षा स्थानिक नेटवर्कचाच उपयोग करत असतात. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चीनने आयटी क्षेत्रात विदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या स्थानिक नेटवर्कला स्प्लिंटरनेट असेही म्हणतात.