
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केल्यानंतर आज चेन्नऊ सुपरकिंग्जकडून 17 वर्षीय आयुष म्हात्रे आयपीएल मधील त्याचा पदार्पणाचा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे खेळणार नसल्याने त्याच्या जागी आयुषला संधी मिळाली आहे.
CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी महेंद्रसिंह धोनी याला कर्णधारपद देण्यात आले. दरम्यान आयुष म्हात्रेला CSK ने ट्रायलसाठी बोलावले होते. त्यानंतर अखेर आजच्या मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यात त्याला संधी देण्यात आली आहे.
आयुष म्हात्रेने मुंबईसाठी नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.