
गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ होताच आता नागरिकांना PNG आणि CNG च्या दरवाढीचाही चटका बसला आहे. मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये महानगर गॅस लिमिटेडने घरात वापरणात येणाऱ्या पाईप गॅस (PNG) आणि वाहनांसाठी लागणाऱ्या CNG मध्ये दरवाढ केली आहे.
लाडक्या बहिणींना खूशखबर… हे घ्या सरकारी गिफ्ट; गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला
PNG च्या दरात 1 रुपया प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर (SCM) वाढ करण्यात आली आहे. तर CNG च्या दरात 1.50 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आल्याची माहिती महानगर गॅसकडून देण्यात आली आहे. या दरवाढीमुळे PNG दर आता 49 रुपये प्रति SCM इतका झाला आहे. तर CNG चा दर हा 79.50 प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. घरगुती वापराच्या गॅसच्या दरवाढीनंतर ही दरवाढ झाली आहे.