![mexico bus fire](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mexico-bus-fire-696x447.jpg)
मेक्सिकोच्या ताबास्को राज्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 41 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतला. बसमधील 48 जणांपैकी 38 प्रवासी आणि दोन्ही चालकांचा मृत्यू झाला, तर ट्रक चालकाचाही अपघातात मृत्यू झाला.
धडकल्यानंतर बसने लगेच पेट घेतला आणि प्रवाशांना बसमधून उतरण्याची संधीही मिळाली नाही. अपघातानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. याचे फोटोही समोर आले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत फक्त 18 मृतकांची पटली आहे.
दरम्यान, मेक्सिकोमध्ये असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही बस आणि ट्रकच्या धडकेत 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 पासून मेक्सिकोमध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2022 मध्ये 381,048 अपघात झाले, ज्यामध्ये 4803 लोकांचा मृत्यू झाला आणि 90 हजारांहून अधिक लोक जखमी झाले.