शंकर महाराज मठाजवळ मेट्रोमुळे धोका होणार नाही, स्वारगेट-कात्रज भुयारी महामेट्रोच्या मार्गिकेत बदल

शंकर -महाराज समाधी ट्रस्ट आणि भक्तांच्या मागणीनुसार समाधीखालून जाणारा संकल्पित भुयारी मार्ग महामेट्रोने बदलला असून, मठाजवळील स्टेशनच्या नामकरणाबाबत कार्यवाही होईल, असे कळवल्याची माहिती सद्‌गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वाईकर, प्रताप भोसले यांनी दिली.

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गांवरील मेट्रो ट्रॅकची आखणी श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी, गाभारा व मठाच्या बाहेरून करणे करण्यात यावी. शिवाय भुयारी मेट्रो मार्ग समाधीखालून जाणार नाही. मेट्रोच्या कामामुळे समाधी आणि मंदिर परिसरास कोणत्याही प्रकारचा धोका वा नुकसान होणार नाही, असे लेखी स्वरूपात आश्वासित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य करून तसे पत्र महामेट्रोने ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला दिले आहे. दरम्यान, पुण्यातील 35 गणेशोत्सव मंडळांनीही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे मेट्रोच्या संचालकांना निवेदन दिले आहे.