मेटा कंपनीचा ह्युमनॉईड रोबोट येतोय, हुबेहूब माणसासारखा रोबोट, घरच्या कामात करणार मदत

तंत्रज्ञानाच्या दुनियेत मोठे बदल होत आहेत. याच बदलाचा भाग बनत मेटा कंपनी आता मानवीय रोबोटवर काम करत आहे. घरगुती कामात मदत करण्याच्यादृष्टीने मेटा कंपनी मानवीय रोबोटच्या निर्मितीचे काम करत आहे.

मेटा कंपनी या प्रोजक्टसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकसित करत आहे. त्यासाठी मेटाच्या रिअ‍ॅलिटी लॅब डिविजनमध्ये एक नवीन टीम बनवण्यात आली आहे. याअंतर्गत यावर्षी १०० इंजिनियर्सची भर्ती केली जाईल.

मेटा कंपनी थेट ह्युमोनॉईड रोबोटला मार्वेâटमध्ये उतरवणार नाही. त्यासाठी आवश्यक अशी एआय सिस्टीम, सेन्सर आणि सॉफ्टवेअर तयार करेल. हे घटक अन्य कंपन्यांना विकले जातील. त्यातून मेटा ब्रँड अंतर्गत रोबोट्स तयार केले जातील. भविष्यात ह्युमनॉईड रोबोटच्या निर्मिसाठी आधार ठरतील असे प्रोटोटाईप विकसित करणे ही मेटा कंपनीची योजना आहे.

अन्य कंपन्यांशी तगडी स्पर्धा

टेस्ला – एलन मस्कच्या टेस्ला कंपनीने याआधीच ऑप्टिमस रोबोट सादर केलेला आहे. याचे अनेक डेमो व्हिडियोही आलेले आहेत. त्यामध्ये रोबोट चालताना, उठताना बसताना किंवा छोटेमोठे काम करताना दिसत आहे.

अ‍ॅपल – अ‍ॅपल कंपनीने पिक्सर स्टाईल लँप डिझाईन केलेला आहे, जो व्हॉईस कमांड आणि जेश्चर कंट्रोलच्या माध्यमातून इंटरॅक्ट करू शकतो.

एनविडीया – ही चिपमेकर कंपनी एआय आणि रोबोटिक्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. ह्युमनॉईड रोबोट टेक्नोलॉजी विकसित करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

ह्युमनॉईड रोबोटचे फायदे

– घरगुती कामांत मदत
– स्मार्ट होम डिवाईसोबत इंडिग्रेशन
– एआय आणि लर्निंग मशीनच्या माध्यमातून काळासोबत स्वतःला अद्ययावत करणे