‘मेटा’च्या 3600  कर्मचाऱ्यांना डच्चू

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटामध्ये पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात नोकरकपात होणार आहे. मेटा पंपनी पुढील आठवडय़ात 3,600 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. यामध्ये विविध देशातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

मार्क झुकेरबर्गच्या नेतृत्वाखालील ‘मेटा’ने अलीकडेच सुमार कामगिरी करणाऱ्या 5 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केलेली आहे. आता सोमवारपासून अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ही नोकरकपात सुरू होणार आहे. त्याच वेळी जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कारण या देशांतील स्थानिक कामगार कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही.