टेक्स्टसाठी आता मेटाचे स्वतःचे एआय टुल

स्वतःच्या एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी मेटा कंपनीने अ‍ॅपल इंटेलिजन्सला व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आहे. त्यामुळे अ‍ॅपलचे लेखन टुल्स मेटाच्या सगळ्या अ‍ॅपवरून गायब झालेले दिसत आहे. मात्र थर्ड पार्टी अ‍ॅप असलेल्या एक्स आणि रेडिट साईटवर ते उपलब्ध असेल. मेटाने अ‍ॅपल इंटेलिजन्सला ब्लॉक केल्याने फॉरमेटींग, रिरायटींग, समरायझिंग अशा सुविधा या अ‍ॅपवर मिळणार नाही. त्याऐवजी मेटा स्वतःचे एआय आधारित टुल घेऊन येतंय.