मेटा पुन्हा एकदा परफॉर्म्सच्या आधारावर मोठी नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. कंपनी जवळपास 3 हजार 600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधीचे संकेत नुकतेच दिले आहेत. मेटा कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 5 टक्के नोकरकपात करणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये सांगण्यात आले की, कंपनीने परफॉर्म्स मॅनेजमेंट स्टँडर्डच्या आधारे खराब परफॉर्म्स कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हे पाऊल 2023 च्या इयर ऑफ इफिशिएन्सी मोहीमअंतर्गत उचलण्यात आले आहे. ज्यात याआधी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना खराब परफॉर्मन्स भोवणार
कंपनीचा फोकस आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट ग्लास आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरसुद्धा होईल. झुकरबर्ग यांनी आगामी वर्षाला इंटेंस म्हटले आहे. हे सर्व नुकत्याच जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत मेटाकडे जवळपास 72 हजार कर्मचारी होते, परंतु आता ही संख्या फारच कमी झाली आहे.