![mephedrone](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/12/mephedrone-696x447.jpg)
ससून रुग्णालयाच्या आवारातून 2 कोटी 14 लाखांचे मेफेड्रॉन जप्त केल्यानंतर या प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणाची व्याप्ती 4 हजार कोटींच्या घरात गेली आहे. पुणे पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेले 3 हजार 672 कोटींचे 1 हजार 836 किलो मेफेड्रॉन दिल्ली येथून संदीप यादव याने परदेशात पाठवलेले 436 कोटींचे 218 किलो असे एपूण 4 हजार 108 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी 16 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे गेल्यानंतर नुकतेच या गुह्यातील आरोपींवर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.