
पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातून (आयडॉल) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रविष्ट होऊन एकाच वेळी दोन पदव्या घेऊ शकतील. यासाठी आज मुंबई विद्यापीठ आणि सीओईपीत सामंजस्य करार करण्यात आला. सीओईपीचे विद्यार्थी आयडॉलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवीच्या बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंटिंग अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रविष्ट होऊ शकतील.