Melbourne test: हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी वाहिली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

Indian cricket team sports black armbands to honour Former PM Manmohan Singh

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शुक्रवारी (27 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या हातावर बांधल्या होत्या. गुरुवारी रात्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ हिंदुस्थानी खेळाडूंनी काळ्या हातवर बांधत त्यांना श्रद्धांजली वाहिली. हिंदुस्थानच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे सिंग यांचं गुरुवारी दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झालं.